Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देवतळे महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चामोर्शी, 26 एप्रिल :चामोर्शी येथील स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात कार्यशाळा नुकतीच पार पडली . सदर कार्यशाळेमध्ये शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू करण्यात येत आहे .याअनुषंगाने इयत्ता १२ वी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार घेण्याकरिता त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.आर.डी.बावणे सर उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.प्रा.डॉ.विवेक जोशी, सहयोगी प्राध्यापक पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. डॉ. विवेक जोशी यांनी विद्यार्थांना power point presentation व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अभ्यासक्रम कसा असेल त्या बद्दल उत्तम अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यशाळेचे संचालन प्रा.मनीष राऊत यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा.वैशाली कावळे यांनी केले, व प्रा.वंदना थुटे यांनी आभार मानले.
कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ.आर.एम.झाडे, डॉ.भूषण आंबेकर, प्रा.दीपक बाबनवाडे, प्रा.डॉ.प्रसेन ताकसांडे, प्रा.अरुण कोडापे, प्रा.संकेत राऊत, प्रा.स्नेहा उसेंडी, प्रा. आशिष कोवासे, तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व चामोर्शी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.