Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात जावून अजून पंचनामे झाले नाही तात्काळ पंचनामे करा:अभिजित कुडे

तहसीलदार यांनी संबधित अधिकाऱ्यांना कॉल करुन दिल्या सूचना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वरोरा, 24 जुलै – तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजून पर्यंत पंचनामे झाले नाही. मुरदगाव येथील शेतकरी आदिनाथ कुंभलकर यांच्या शेतातील माती खरडून गेली आहे त्यासंबंधी चे निवेदन दिनांक 4 जुलै ला दिले असून अजून पर्यंत पटवारी, कृषी सहाय्यक शेतात पंचनामा करा साठी गेले नाही त्या नंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे तरी पण याचे गांभीर्य त्यांना नाही त्या संबंधी आज तहसीलदार साहेब यांची भेट घेवून त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली, नुकसान किती प्रमाणात झाली त्याचे फोटो दाखविले.

संबधित अधिकाऱ्यांना तसा आदेश दिनांक 19 जुलै ला मिळून देखील अधिकारी हलगर्जीपणा करत आहे. ग्राम सेवक, कृषी सहाय्यक, पटवारी यांनी आपापसात चर्चा करून तात्काळ शेतकर्‍यांच्या बांधणार जावून पंचनामे करावे अन्यथा आम्हाला पंचनामे करावे लागेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे असे निवेदन देखील देण्यात आले.
तालुक्यातील 186 गावातील शेतकर्‍यांना या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी अभिजित कुडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.