Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक स्थगित करा : शेतकरी कामगार पक्ष

नव्याने निवडणूक प्रक्रीया राबविण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २१ जानेवारी: गडचिराली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. गडचिरोली र.नं. २६ च्या निवडणूकीचा कार्यक्रम आपण दिनांक १४ जानेवारी रोजी जाहीर केल्याचे माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, गडचिरोली मार्फत स्थानिक वृत्तपत्र आणि डिजिटल मिडियामध्ये प्रसिध्द न झाल्याने सदर निवडणूकीकरीता इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे सदर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संधी हिरावली गेली असून सदर निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करुन नव्याने निवडणुक प्रक्रीया राबविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाई रामदास जराते यांनी याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निवडणूकी संबंधात बँकेच्या नोटीस बार्डावर २० जानेवारी पर्यंत सुचनाही लावण्यात आलेली नाही. एवढेच नाही तर सदर निवडणूकीकरीता पात्र मतदार संस्था, व्यक्ती यांची यादीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रकाशित अथवा जाहीर केल्याचे कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले नाही किंवा नोटीस बोर्डावर लावलेली नाही. एकुणच सध्याच्या संचालकां व्यतिरिक्त इतर कुणाला संधी मिळू नये अशाच पध्दतीने, अपारदर्शी कार्यपध्दती आपण निवडणूकीसंबंधाने अवलंबलेली दिसून येत असून त्याचा मोठा फटका इच्छुकांना बसलेला असून आपल्याकडून दुजाभाव करण्यात आलेला आहे, असा आरोपही भाई रामदास जराते यांनी केला आहे.

सदर निवडणूक प्रक्रीया आहे त्या टप्प्यावर स्थगित करून पुन्हा व्यापक प्रसिध्दी आणि नियमोचित कार्यवाही करून नव्याने राबविण्यात यावी. आपण येत्या २४ तासात सदर निवडणूक प्रक्रीया स्थगित केली नाही तर आपल्या विरोधात उच्च न्यायालयात आम्ही दाद का मागू असा इशाराही शेतकरी कामगार पक्षातर्फे भाई रामदास जराते यांनी ज्ञानेश्वर खाडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यांना दिला आहे.सदर तक्रारीची प्रत सहकार विभागाचे मुख्य सहसचिव,राज्याचे सहकार आयुक्त यांनाही पाठविण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.