Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 08 सप्टेंबर :-  राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश दिनांक 07/09/2022 अन्वये जानेवारी 2021-मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम- 2022 पुढील प्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील 08 तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीकरिता (सदस्य पदांसह थेट सरपंच) राबविण्यात येत आहे.

निवडणूकीचे टप्पे दिनांक:-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ) दि. 21 सप्टेंबर2022 (बुधवार) ते दि.27 सप्टेंबर 2022 ( मंगळवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 (दिनांक 24 सप्टेंबर 2022 चा शनिवार व दिनांक 25 सप्टेंबर 2022 चा रविवार वगळून), नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) दि.28 सप्टेंबर 2022 (बुधवार) वेळ स.11.00 वा. छाननी संपेपर्यंत,नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) दि. 30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 30 सप्टेंबर 2022 (शुक्रवार )दुपारी 3.00 वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 13 ऑक्टोंबर2022 (गुरुवार) (गडचिरोली जिल्हयासांठी स.7.30 वा.पासून ते दुपारी.3.00 वा.पर्यंत), मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील).दि. 14 ऑक्टोंबर 2022 (शुक्रवार) तरी वरीलप्रमाणे निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड लोहप्रकल्पाच्या जडवाहतुकीने रस्त्यासह नागरिकांचे मोडले कंबर्डे..

Comments are closed.