Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरातील मेडिकल मध्ये रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द

तात्काळ वसतिगृह सोडण्याचे मेडिकल प्रशासनाचे आदेश, 6 विद्यार्थांची पोलिसात तक्रार होणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपुर 1 डिसेंबर :- नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकल मध्ये इंटर्नशिप करीत असलेल्या 6 विद्यार्थ्यांनी मिळून MBBS च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थांची रॅगिंग घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे,  त्यामुळे या रॅगिंग प्रकारची आरोग्य विभागाचा रॅगिंग विरोधी समितीने याची गंभीर दखल घेऊन रॅगिंग घेणाऱ्या सर्व सहाही विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा बाहेत काढून त्यांची इंटर्नशिप रद्द केली आहे.

तसेच लवकरच त्यांच्यावर पोलिसात तक्रारही दाखल केली जाणार आहे. MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय रुग्णालयात 1 वर्ष रुग्ण सेवा देण्याला इंटर्नशिप म्हटले जाते,  या 6 विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थांची रॅगिंग घेत त्याचा गालावर थापड मारल्याचे स्पष्ट होताच या 6 विद्यार्थ्यांचा विरोधात कारवाही केल्याचे मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.