Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्या परिषदेवर सदस्यांचे नामनिर्देशन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर 24 फेब्रुवारी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. माननीय राज्यपाल यांच्याकडून आठ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती तर दहा सदस्यांचे कुलगुरूंकडून विद्या परिषदेवर नामनिर्देशन करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपतींकडून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मधील ३२(३)(i) तसेच सेक्शन ६२ नुसार सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

यामध्ये नागपूर व्हीएनआयटी मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत भास्कर कटपातळ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर येथील संजीव डी. वैद्य, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वारंगा नागपूर येथील अधिष्ठाता डॉ. एस.जी. कोठारी, राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर येथील डॉ. हिमांशू पांडे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल यू. भिकाने, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपूर येथील फलोत्पादन- फळ विज्ञान विभागातील तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष अनिरुद्ध मुरकुटे, नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे सदस्य डॉ. अनंत पांडे तसेच धंतोली नागपूर येथील प्रमोद जावंधिया यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी महामहीम राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून पुढील व्यक्तिंचे नामनिर्देशन विद्यापरिषदेवर केले आहे. यामध्ये जरीपटका नागपूर येथील राजकुमार केवलरामानी गर्ल्स आर्ट कॉलेजच्या प्राचार्य डॉ. डबीर उर्मिला वामनराव, सेवादल महिला महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ. चरडे प्रवीण नथ्थुजी, दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ. कुमार श्रद्धा अनिल, भंडारा येथील जे. एम. पटेल आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. ढोमणे विकास प्रभाकर, वर्धा येथील बी.डी. कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे डॉ. ठाकरे गिरीश विश्वेश्वरराव, रोहना वर्धा येथील स्व. वसंतराव कोल्हटकर आर्ट कॉलेजचे प्राचार्य डॉ. माथनकर नितीन आनंदराव, नागपूर येथील तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. खुल्लर लळीत, नागपूर येथील बिंझानी सिटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मेत्रे सुजित गजाननराव, नागपूर येथील प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. ढाले श्रीकृष्ण आनंदराव आणि नागपूर येथील गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. आत्राम रामदास गोमाजी आदी दहा सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. नामनिर्देशित सर्व सदस्यांचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी अभिनंदन केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.