Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जानेवारी 2021 मधील ग्रामपंचायत निवडणूकीतील मागासवर्गीय विजयी उमेदवारांच्या जात पडताळणीबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 21 जून : माहे जानेवारी 2021 मध्ये संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणुक लढवुन विजयी झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी अदयाप आपले जाती प्रमाणपत्राच्या पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन भरुन समिती कार्यालयात सादर केले नाहीत.

तसेच समितीकडे सादर केलेल्या आपल्या जाती दाव्यातील त्रृटीची पुर्तताही अद्याप न केलेल्या तसेच जाती दाव्यातील त्रृटीची पुर्तता अद्याप न केलेल्या अशा सर्व उमेदवारांना अंतीम संधी म्हणुन दिलेल्या तारखेवर उपस्थीत राहाणे अनिवार्य आहे असे आवाहन उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जात प्रमाणपत्र पडातळणीचे कामकाज ऑनलाईन झाल्यामुळे माहे डिसेंबर 2020 व जानेवारी 2021 मध्ये राखीव संवर्गातील काही उमेदवार आपले जात प्रमाणपत पडातळणीचे अर्ज ऑनलाईन सादर करुन परस्पर निवडणूक लढविलेली आहे. व त्यातील काही उमेदवार राखीव संवर्गातून निवडणुक विजयी देखील झालेले आहेत.

त्यापैकी काही उमेदवारांनी अद्याप पर्यंत समिती कार्यालयात संपर्क साधलेले नाही. तसेच काही उमेदवारांनी पुर्वी माहे. फेव्रुवारी व मार्च 2020 मध्ये जे प्रस्ताव सादर केले होते ते प्रस्ताव नस्तीबध्द करुन संबंधीत तहसिलदार यांना पत्राव्दारे तसेच वर्तमानपत्रांत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले. त्यामुळे सदर प्राप्त अर्ज पुढील निवडणुकीसाठी ग्राहय धरण्यात आलेले नाहीत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यापैकी काही अर्जदारांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज भरुन ऑनलाईन अर्ज, वंशावळीचे नमुना-3 मधील शपथपत्र व नमुना-21 चे शपथपत्र तसेच मुळ पुरावे यासह समिती कार्यालयात संपर्क साधलेला नाही. तर काही उमेदवारांनी संपर्क केला मात्र अर्जातील त्रृटीची पुर्तता अद्यापही केलेली नाही.

त्यानुसार माहे जानेवारी 2021 मध्ये राखीव प्रवर्गातून निवडणुक लढवून विजयी झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी आपले जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरुन ऑनलाईन अर्ज, वंशावळीचे नमुना 3 मधील शपथपत्र व नमुना-21 चे शपथपत्र तसेच मुळ जात प्रमाणपत्र, निवडणुन आल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराची प्राथमिक शाळेची टि.सी. वडीलाची तसेच मोठे वडील, आत्या यांची प्राथमीक टि.सी. सख्खे आजोबा/पणजोबा यांची किंवा त्यांचे सख्खे भाऊ / बहीण यांची प्राथमीक टि.सी गडचिरोली जिल्हयातील मानीव दिनांक. अनु. जाती 10.08.1950, भजक,ब,ड, विजे 21.11.1961, तसेच इमाव,विमाप्र 13.10.1967, सख्खे आजोबा/ पणजोबा यांचे नावे शेत जमिनीचे वा इतर महसुली पुरावे (जसे कर आकारणी, जन्म मृत्युची नोंद असलेले पुरावे) असे सर्व पुरावे व कागदपत्रे यांच्या मुळ व छायांकीत प्रतीसह समिती कार्यालयात यथाशीर्घ्र सादर करावेत तसेच ज्या आरक्षित प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रस्तावातील त्रृटीची पूर्तता अद्याप केलेली नाही.

त्यांना त्यांचे ई मेलवर तसेच पत्राव्दारे त्रृटी कळविण्यात आले असून दिनांक 28.05.2021 पर्यंत त्रृटी पूर्तता करण्यास सुचीत करण्यात आलेले होते, त्यांनी त्यांचे प्रकरणी अद्याप त्रृटी पूर्तता केलेली नाही त्यांनी दिलेल्या तालुकानिहाय दिलेल्या तारखेवर स्वत: उपस्थित राहुन पुरावे सादर करुन आपल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी दाव्यातील त्रटींची पुर्तता करावी, दिलेल्या तारखेवर स्वत: उपस्थित राहुन सादर करुन आपल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी दाव्यातील त्रृटीची पुर्तता करावी, जर नमुद तारखेवर उपस्थित पुरावे/राहुन त्रृटीची पुर्तता करण्यात आली नाही तर होण्याऱ्या सर्व परीणामास असे उमेदवार स्वत: जबाबदार राहतील तसेच असे त्रृटीतील प्रकरणे सादर केलेल्या पुराव्यानुसार नस्तीबध्द केले जातील /निकाली काढण्यात येतील याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

या तारखांनुसार उपस्थित रहावे : गडचिरोली- 23 जून, आरमारी, देसाईगंज (वडसा)-24 जून, अहेरी, सिरोंचा – 29 जून, चामोर्शी – 30 जून, कुरखेडा, कोरची एटापल्ली – 1 जुलै, जिल्हाबाहेरील उमेदवार – 1 जुलै.

Comments are closed.