Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सूरजागड वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरणासाठी 11 जुले ला रस्ता रोको आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

07 जुले – सुरजागड लोहखनिज वाहतुक करणान्या जड वाहनांमूळे अनेक निरअपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक लोकांना अपंगत्व झाले व कित्येक लोक जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे आपली ते आष्टी मार्गावर अनेक गांवे रस्त्याच्या बाजूला असून लोहखनीज वाहतूक करणान्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील व रस्त्याने ये-जा करण्याऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावे लागत आहे.तसेच विद्यार्थ्याचे यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे.

लगाम,बोरी तसेच राजपूर पॅच व इतर अन्य गावातील विद्यार्थी यांना रोज शाळेत ये-जा करावे लागते.परंतु सुरजागड वाहतूक करणाऱ्या वाहनांमूळे आलापली ते आष्टी मार्गांवर खुप मोठ-मोठे खड्डे पडले आहेत आणि जड वाहनांची रेलचेल नेहमीच असते.त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य नागरिकांना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.तसेच एखादे लोहखनीज वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर फसून राहतात. वाहनांची खूप मोठी रांग निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू न शकल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मद्दीगुडम येथील लोहखनीज साठवणूक डंपींग यार्ड हे त्या गावातील नागरिकांना आणि त्या गावावरून ये-जा करणाऱ्या नागरिकासाठी शापच आहे.कारण लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमूळे तसेच रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे अनेक दुचाकी वाहन धारक यांचा तोल जाऊन अपघात होत आहे.त्यामुळे मद्दीगुडम येथिल डंपिंग यार्ड लोहखनीज साठवणूक बंद करण्यात यावे अश्या प्रकारची मागणी येथील नागरिकांची आहे.तसेच मद्दीगुडम येथील वनविभागाच्या जागेवर अनेक लोहखनीज वाहतूक करणारे वाहने अवैध रित्या उभी करण्यात येत आहे ते बंद करण्यात यावे,आणि या परिसरातील जंगलात अवैध वृक्षतोड करून जंगलाचा नुकसान सदर कंपनीने केलेला आहे म्हणून त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच मद्दीगुड्म येतील डंपिंग यार्ड ला नियमाचे उल्लंघन करून मंजूरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

आलापली ते आष्टी मार्गावरील लोहखनीज वाहतूक बंद करण्यात यावे कारण या मार्गांनी वाहतूक करणाऱ्या अनेक निरअपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सदर मार्गाने ये-जा करणारे नागरिक अपघातामध्ये जखमी झाले आहेत.त्या निरपराध मृत पावल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ५०,००,००० रुपये अपंगत्व आलेल्याना १५,००,००० रुपये जखमी झालेल्या व्यक्तींना ५००००० रूपयाची नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी,तसेच ज्या वाहनामुळे वाहनचालकांमुळे अपघात झाला आहे त्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे,तसेच ज्याप्रमाणे आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचे काम चालू असल्यामुळे त्याने बंदी घातली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याचप्रमाणे आलापली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात यावे.तसेच सूरजागड पहाड़ीकडे जाणाऱ्या जंगलातून जो नवीन रस्ता होत आहे.या रस्त्याचे बांधकाम हे कोणत्याही प्रकाराची मंजूरी न घेता रस्ता तयार करण्यात येत आहे त्यांची चौकशी करून करवाई करण्यात यावी,वेलगुर टोला ते वडलापेठ रस्त्याची रुंदीकरण करून रस्ता तयार करण्यात येत असून रस्त्याच्या बाजूला लोकांची वस्ती व शाळा आहेत तसेच ग्राम पंचायत किंवा व ग्राम सभेकडून नाहरकत प्रमाणपत्र ना घेता सदर काम करत आहेत त्यामुळे ते मंजूर असलेला काम रद्द करण्यात यावी.तसेच अहेरी ते आलापल्ली,अहेरी ते सुभाषनगर,अहेरी ते खमनचेरू आणि अहेरी ते आवलमरी या रस्त्यांच्या बांधकामांना मंजूरी देऊन सदर सर्व रस्ते बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.

वरील सर्व मुद्यांवर सात दिवसाचे आत अंमलबजावणी करून आमचे मागण्या पूर्ण न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय काहीच पर्याय असणार नाही त्याकरीता त्वरित मागण्या मान्य करावी अन्यथा दिनांक ११/७/२०२३ ला बोरी येत आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार यांच्या नेत्रुत्वात परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन अहेरीचे उपविभगिय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब,अप्पर जिल्हाधिकारी साहेब मा.उपविभागीय दंडाधिकारी साहेब, उपविभाग,मा.तहसीलदार साहेब अहेरी,पोलीस निरीक्षक साहेब अहेरी यांना माहितीस व कार्यवाहीस सादर केले आहे.

हे पण पहा :-

Comments are closed.