Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राठोड गुरुवारी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पोहोचणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ, दि. १६ फेब्रुवारी:- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होताच राठोड यांच्यासह फोनहीं नॉटरिचेबल झाले. इतका मोठा गंभीर आरोप होत असताना संजय राठोड कुठे भूमिगत झालेत ते या आरोपांना सामोरे का जात नाहीत असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत असला तरी संजय राठोड हे येत्या गुरुवारी म्हणजेच 18 तारखेला वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पोहोचणार असल्याचा खुलासा पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ निघालेल्या दिग्रस येथील मोर्चा दरम्यान केला आहे.

Comments are closed.