Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील ‘अ’ श्रेणी शाळांचे फेब्रुवारी-मार्चमध्ये शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन

प्राथमिक शाळा 278 तर माध्यमिक शाळा 52

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 24 फेब्रुवारी :- शाळासिद्धी मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमूल्यमापनात अ श्रेणी प्राप्त २०२०-२१ या वर्षात निवडलेल्या राज्यभरातील ११ हजार ८५१ शाळांमध्ये जिल्ह्यातील ३३० शाळांचे बाह्यमूल्यमापन फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या बाह्यमुल्यमापन संदर्भात २४ फेब्रुवारी रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षणही दिले जाणार आहे.शालेय स्तरावरील मूल्यांकनाचे सर्व निकष व निर्णय रद्द करून केंद्रीय पद्धतीने समृद्ध शाळा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत शाळासिद्धी अंतर्गत हे नवे मूल्यांकन होत आहे,राज्यातील सर्व शाळांचे शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वमूल्यांकन करणे व त्यामधील शाळांना समृद्ध शाळा करणे आदी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यभरात दोन वर्षापूर्वी स्वयंमूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यामध्ये बहुतांश शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली होती. त्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांच्या बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया गेली दोन वर्ष रखडली होती. आता या शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. यंदा ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून जिल्ह्यातील 278 प्राथमिक शाळा तर 52 माध्यमिक शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे.प्रत्येक शाळेने काही निकषांवर स्वतःचे मूल्यमापन करीत अ श्रेणींचा दावा केला असला तरी आता बाह्य निर्धारकाकडून मुल्यमापन केले जाणार आहे. प्रत्यक्ष शाळांना हे शिक्षक भेट देवून शालेय अभिलेखे तसेच पुरावे, भौतिक सोई सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती, नवे उपक्रम आदी शाळांची पाहणी केली जाणार आहे. याकरिता प्रशिक्षक निर्धारक गट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ फेब्रूवारीपासून विशेष कार्यक्रम आखला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१५ मार्चपर्यंत बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.बाह्यमूल्यमापनासाठी आवश्यक काही मार्गदर्शक सूचनांसाठी व राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत अ श्रेणी प्राप्त शाळांचे बाह्यमूल्यमापन यासंदर्भातील कार्यवाही बाबत माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेनंतर लागलीच २७ फेब्रुवारीपासून बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने १५ मार्च अखेरपर्यंत बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बाह्य मूल्यमापन करण्यासाठी जिल्यातील सर्व यंत्रणेने निर्धारकाना योग्य सहकार्य करावे असे आवाहन DIET चे प्राचार्य डॉ. विनित मत्ते यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.