Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनीषा निखिल हलदारची म्हाडामध्ये स्थापत्य अभियंता म्हणून निवड

म्हाडाच्या परीक्षेत गडचिरोलीच्या मनीषाने मिळवले दैदिप्यमान यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली प्रतिनिधी 19 सप्टेंबर :-  वादात अडकलेल्या म्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी- फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला असून यात गडचिरोली येथील मनीषा निखिल हलदार हीने दैदिप्मान यश संपादन केले आहे. मनीषाची गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण महाराष्ट्र सरकार (म्हाडा) येथे स्थापत्य अभियंता म्हणून निवड झाली आहे. मनिषणाने आपल्या यशाचे श्रेय तिच्या आई वडिलांना दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र सरकार गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने सरळ सेवा भरतीअंतर्गत मागविलेल्या अर्जांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जवळपास दोन लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र यावेळी झालेल्या मोठया गैरव्यवहामुळे अनेकांना अटक झाल्याने ही परीक्षा रद्द
करण्यात आली. त्यानंतर म्हाडाने रिक्त पदांच्या भरतीसाठी टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी- फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल बुधवारी म्हाडाने जाहीर केला आहे. निकालानुसार आता निवड यादीतील उमेदवारांना नियमानुसार सेवेत समावून घेण्यात येणार आहे. तसेच हा निकाल उमेदवारांना म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

मनीषा निखिल हलदार हीने मुलचेरा येथील राजे धर्मराव हायस्कूल मधून मध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून, शासकीय पॉलिटेक्निक गडचिरोली येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma) पूर्ण केला. तर, पुण्यातील अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी (degree) घेतली आहे. तिने महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची विभागीय परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आता म्हाडा मध्ये स्थापत्य अभियंता म्हणून तिची निवड झाली आहे. मनीषाने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन याचा वर्षा होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.