Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूत दर्जेदार रस्ता बांधकाम केल्या शिवाय प्रकल्पाची सर्व जडवाहने तात्काळ बंद करा

नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 19 सप्टेंबर :-  गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील लायड मेटल कंपनी अंतर्गत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे फार मोठ्या प्रमाणात लोहखनिज दगड उत्खनन सुरु असुन प्रती दिवस शेकडो जडवाहनाने खनिज माल वाहतूक सरु आहे. या प्रत्येक जडवाहनातून किमान ५० टन माल वाहून नेताना आढळतात. अशा जास्त वजनाच्या जड वाहनाने आलापल्ली ते आष्टी महामार्ग पूर्णत:हा खराब झालेला असून रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या महामार्गावर अपघातास निमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत. ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असून परीसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सुरजागड प्रकल्पाच्या जडवाहनाने मनमर्जीपणाची धुळ उडवत वाहतूक केली जात आहे. अनेक वाहन चालक दारुच्या नशेत वाहने चालविताना दिसून येतात. खराब रस्त्यांमुळे अनेकांचे खाजगी चारचाकी वाहने खराब होत आहेत.

शिवाय आपत्तीकालीन वैद्यकिय आरोग्य तपासणी व उपचारा करीता चंद्रपुर, गडचिरोलीला जाणाऱ्या रुग्णांची रस्त्याअभावी गैरसोय होत असून गरोदर महिलांना त्रास होत आहे, व धोका संभवत आहे. केवळ आलापल्ली ते आष्टी पन्नास मिनिटांचा रस्ता असून खराब खड्डेमय रस्त्यांअभावी प्रवासाला दोन तासाहून अधिकचा कालावधी लागत आहे. काही वाहनचालक अरेरावी करुन वाहने चालवितात व दुसऱ्या वाहनाना रस्ता देत नसल्याने लहान वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेक जुने- पुराणे जडवाहनाने माल वाहून नेताना अनेक गाड्यात बिघाड होऊन रस्त्यात थांबलेले दिसतात. तेव्हा लोहखनिज वाहतुक करण्या करीता नविन बायपास रस्ता तयार करण्यात यावा.दर्जेदार मजबूत रस्ता तयार होई पर्यंत लोहखनिज वाहतूक बंद करावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्येक गाडीची आरटीओ कडून योग्य तपासणी करण्यात यावी.
  • आलापल्ली येथे धरमकाटा लावून लोहखनिज वाहून नेणाऱ्या जडवाहनांचे निर्धारीत वजन करुन जास्तीचा माल वाहून नेणाऱ्या वाहनावर कार्यवाही करावी.
  • मोजा आलापल्ली येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वाहन चालकाची मादक पदार्थाचे सेवन नशा केली आहे किंवा कसे याची तपासणी करावी.
  • प्रत्येक लोहखनिज वाहून नेणाऱ्या जड वाहनाचे टिपी तपासणे करीता आलापल्ली येथे महसुल विभागाने टिपी तपासणी नाका तयार करणे.
  • सुरजागड लोहखनिज प्रकल्पा अंतर्गत शासनाला आता पर्यंत किती महसूल निधी जमा झालेला आहे व सदर निधी कोणकोणत्या विकासकामावर खर्च करण्यात आला आहे.यांची उच्चस्तरीय चौकशी करावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जड वाहनांमुळे उडणारी धुळ नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे ती तात्काळ थांबविणे. परंतू सध्या खडेमय रस्त्या अभावी नागरीकाना प्रचंड त्रास होत असून परीसरातील जनतेत असंतोष व संतप्त वातावरण आहे. तेव्हा आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूतीकरण करुन दर्जेदार रस्ता निर्मीती करावी व नंतर वाहतुक सुरु करावी . ज्यामुळे जडवाहने चालतील व जनतेला त्रास होणार नाही.

रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुरजागड प्रकल्पाचे लोहखनिज वाहून नेणारी सर्व जड वाहने तात्काळ बंद करावीत. ही वाहने बंद न केल्यास लोकशाहीच्या मार्गाने मौजा आलापल्ली येथे विविध सामाजिक संघटना व परीसरातील जनतेला सोबत घेऊन मा.अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने रस्ता रोको व जेलभरो आंदोलन केले जाईल. तेव्हा तातडीने लोहखनिज वाहून नेणाऱ्या सगळ्या गाड्या बंद करा व वरील मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी . असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे.

या विषयाबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मा. सचिव, खनिकर्म ,महाराष्ट्र्र शासन, मा. विभागीय आयुक्त नागपूर – सिव्हिल लाईन यांनाही देण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.