शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांची बाजू सावरण्याचा स्वयंघोषीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांचा केविलवाणा प्रयत्न
- अरविंद कात्रटवार यांच्या हकालपट्टीची तक्रार केल्यानंतरही त्यांची जिल्हा नियोजन समितीमध्ये कशी निवड झाली?
- आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याची शंका उपस्थित करून सेना नेत्यांचा अरविंद कात्रटवार यांच्यावर पलटवार…
- मोजक्या व्यावसायिक लोकांना अनाधिकृत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षात दुफळीचे चित्र निर्माण करीत असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आरोप.
गडचिरोली, दि. १४ डिसेंबर: अरविंद कात्रटवार हे शिवसेनेचे संघटक पदावर असून उपजिल्हा प्रमुख पदाचा अनाधिकृतपणे किशोर पोतदार गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या आशीर्वादाने पोस्टर, बॅनर, सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी करीत असल्याने अधिकृत उपजिल्हा प्रमुख याबाबतीत प्रखर नाराजी व्यक्त करीत, वरिष्ठाकडे सूचना दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा मनमानी कारभारामुळे व मागील दोन वर्षापासून पक्ष वरीष्ठाशी कोणत्याही प्रकारचे शिस्तीचे पालन न केल्याने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकसुरात नाराजी व्यक्त करीत होते. स्वतःचा स्वयंघोषीत उपजिल्हा प्रमुख या पदाचा गैरवापर करीत आघाडी सरकारचा विरोधात जाऊन ना. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या कोट्यातून पालकमंत्री पद बहाल झाल्याने स्थानिक एका वृत्तपत्रात जिल्हाला प्रतिनिधित्व न दिल्याने सरकारचा तीव्र निषेध अरविंद कात्रटवार यांनी केला होता. शिवसेना पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जाऊन जाहीरपणे निषेध केल्याने अरविंद कात्रटवार यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी सह संपर्क प्रमुख माजी आ. रामकृष्ण मडावी व जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार यांना पदाधिकाऱ्यासह मुंबईत सेना भवनात बोलावून अरविंद कात्रटवार यांची सेनेमधून हकालपट्टी करण्यासाठी स्वत:चे लेटर हेडवर सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह १७ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते.
त्यामुळे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या व शिवसैनिकांमध्ये एकाच संभ्रम निर्माण झाला आहे की, अरविंद कात्रटवार यांच्या विरोधात हकालपट्टीची तक्रार झाल्यानंतरही त्यांची जिल्हा नियोजन समितीमध्ये कशी निवड करण्यात आली? कदाचित याबाबतीत आर्थिक देवानघेवाणीचे व्यवहार करून पद बहाल केले काय? अशी शंका उपस्थित होत आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व स्वतःचा पद वाचविण्यासाठी आवभगत करून निष्ठावंत शिवसैनिकांना बदनाम करून जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न स्वयंघोषीत उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार हे करीत आहेत.
हे पण वाचा – ग्रामपंचायत निवडणूक:- जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या, अर्जाची पोचपावती आवश्यक.
११ डिसेंबर २०२० रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख, आजीमाजी व पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक यांनी जिल्हा संपर्क प्रमुख यांची गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यासंबंधी पत्रकार परिषद घेवून आपले जाहीर मत व्यक्त केले होते. यासंबंधित स्वयंघोषीत उपजिल्हाप्रमुख यांनी १३ डिसेंबर रोजी एका स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून किशोर पोतदार यांची बाजू सावरण्याच्या प्रयत्न केला होता. जिल्हातील बहुतांश शिवसैनिक पदाधिकारी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या विरोधात असतांना जेमतेम मोजके व्यावसायिकांना, अनाधिकृत पदाधिकाऱ्यांंना सोबत घेऊन पक्षात दुफळी असल्याचे चित्र निर्माण करीत आहेत. मागील दोन वर्षापासून त्यांच्या कारस्थानीमुळे पक्ष संघटनेचे काम मंदावले आहे. जिल्ह्यात पक्षाचे काम वाढविण्यासाठी, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी या गंभीर विषयावर तात्काळ दखल घ्यावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसेना पक्ष प्रमुख यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे. असे मत शिवसेना गडचिरोली जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार आणि माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार व शिवसेना पदाधिकाऱ्यांंनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
Comments are closed.