Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र !

महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले शिवसैनिक सर्वात मोठा हेच आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 11, सप्टेंबर :- शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरून अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

सदा सरवणकरच्या विरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यांना जेव्हा पोलिसांनी सोडलं त्यानंतर हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचं कौतुक केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे स्वतः जमिनीवर बसत या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला दिलं. शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना हा एक परिवार आहे हेच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या कृतीतून दाखवून दिलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.