Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे क्लोरी ऑफ आलापल्ली येथे अभ्यास दौरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

आलापल्ली, 4 एप्रिल :-स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी येथील वनस्पती शास्त्र विभागातर्फे बीएससी अंतिम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे आलापल्ली वनपरिक्षेत्रात असलेले ग्लोरी ऑफ आलापल्ली येथे एक दिवशीय शैक्षणिक सहल आयोजित करून विविध वनस्पती बद्दल अभ्यास करण्यात आले. बीएससी अंतिमच्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार “जैव विविधता आणि त्यांचे संरक्षण” या विकल्प विषयाच्या अनुषंगाने वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. रमेश हलामी यांच्या नेतृत्वात प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा आयोजित करण्यात आले होते.

पूर्वीच्या काळापासून वनस्पती आणि मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत वृक्षांना व फळांना महत्त्व देण्यात आलेले आहे विविध प्रकारचे वनस्पती व प्राणी परिसरात आढळतात त्यांचा उपयोग मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व पर्यावरणासाठी उपयोग व्हावा यासाठी जैवविविधतेचे संरक्षण व्हावे शिकताना विद्यार्थ्यांनी ते माहिती करून समाजाला मार्गदर्शन करावे म्हणून अभ्यास दौरा करण्यात आले. सदर दौऱ्यात आवडा, बेल, औदुंबर, वड, र्पिंपळ कवट चंदन, टेंभुर्णी मोह, हिरडा बेहडा सिसम, अर्जुन बिजा, हलदू, कळम इत्यादी प्रजातींची बॉटनिकल नाव कुडाचे नाव व त्याचे उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी आलापल्ली वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश येरेकर, वनपाल राजुरकर तसेच वनरक्षक यांनी आलापल्ली वन वैभवचा संपूर्ण इतिहास सांगितले. तात्कालीन डीएफओ मुजुमदार व मॅकडोनाल्ड यांनी परिसराची कार्य योजना तयार करून 1953 मध्ये कक्ष क्रमांक 76 मध्ये सहा हेक्टर जतन भूखंड स्थापन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समुद्रसपाटीपासून 750 फूट असून पर्जन्यमान पंधराशे मिलिमीटर आहे, त्या भूखंडामध्ये एकूण 347 प्रजाती चे वृक्ष आढळून आलेले आहेत. त्यापैकी एकट्या सागाचे वृक्ष हे 15 ते 20 वेडी वरील गोलाकार बुंद्याचे आहेत सागाचे दोन झाडे राम- लक्ष्मण प्रसिद्ध आहेत, त्यापैकी लक्ष्मण हे सद्यIस्थितीत उभे आहे पण राम हे झाड 1960 मध्ये पडल्यामुळे त्याला बल्लारशा येथे कास्ट भंडार मध्ये ठेवण्यात आले आहे. सदर सागाचे झाड उत्कृष्ट असल्यामुळे आशिया खंडातील प्रसिद्ध झाड मानले जाते सदर अभ्यास दौरा वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अभ्यास दोऱ्या दरम्यान वनस्पती शास्त्र विभाग बीएससी फायनल वर्षाचे 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका कुमारी कांचन आत्राम यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.