Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकाच कुटूंबातील तीन लोकांचा आत्महत्येने खळबळ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नवापूर, 23 मे – नवापूर शहरातील तीन टेम्बा परिसरातील एकाच कुटूंबातील तीन व्यक्ती नी रेल्वे खाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.नगर परिषद हद्दीतील तीनटेंबा परिसरातील सावत सैय्यद गावित वय 21 पत्नी रोशनी सावत गावित आणि वडील सैयद कर्मा या तिघांनी रात्री च्या 11 ते 01 वाजे च्या सुमारास रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की नवीन दुचाकी घेण्याचा वादातून सदर घटना घडली असल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले असून रात्री 11 वाजे च्या सुमारास सावंन सैयद गावीत वय 21 व त्याची पत्नी यांनी दोघांनी आत्महत्या केल्या चे समजताच वडिलांनी ही रात्री एक वाजेच्या सुमारास रेल्वे खाली आत्महत्या केली होती. बातमी वार्या सारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले होते.

सकाळी तिंघाचे मृतदेह शवविच्छेदना साठी उपजिल्हारुग्णालयात आणले होते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं सहकारी युवराज परदेशी,विकी वाघ,योगेश थोरात,प्रताप वसावे हे करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.