Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हत्तीरोगापासून बचावाकरीता औषधाचे पूर्ण डोज घ्यावे – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 जून : जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली येथे आज, दि. 28 जून रोजी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम दि. 1 जुलै 2021 ते 15 जुलै 2021 दरम्यान राबविण्यात येणार आहे.

यावेळी IDA कार्यक्रमाचे महत्व, औषधांची सुरक्षितता व प्रत्येक व्यक्तीने गोळया खाण्याचे महत्व या बाबीवर पत्रकार परिषदेत भर देण्यात आला. हत्तीरोग हा डासांपासून होणारा एक संक्रमक रोग असून हत्तीपाय (फायलेरिया) या नावाने ओळखला जातो. प्राथमिक अवस्थेत कोणतेही लक्षण दिसून येत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संक्रमित डास चावल्यानंतर साधारणत: 16-18 महिन्यानंतर हत्तीरोगाची लक्षणे दिसू लागतात. ताप, अंग खाजविणे तसेच पुरुषांच्या जननेंदिय व अंडाकोषावर (हायड्रोसील) सुज येवून वेदना होतात. पाय व त्वचेवर सुज येते. हत्तीपायासारखा पाय होतो. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले.

तसेच यावेळी औषधी परिणामाबद्दल मोडक यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीच्या शरीरात हत्तीरोगाचे जंतु आहेत त्यांना हे औषध खाल्यावर शरीरातील जंतु मरण्याची प्रक्रिया सुरु होते. त्या वेळेस डोकेदुखी, अंगदुखी, ताप उल्टी, शरीरावर चट्टे आणि खाज या सारख्या समस्या होऊ शकतात. पण घाबरण्याचे कारण नसून काही वेळातच ही लक्षणे आपोआप नाहिशे होतात. जर तीन औषधीची (आय.डी.ए.) एक योग्य मात्रा खाल्यानी अजून काही समस्या वाटल्यास ताबोडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी फायरेरिया अधिकारी, धानोरा पी.व्ही लवाडे, आरोग्य सहायक कालीदास राऊत, तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी उपस्थिती होते. हत्तीरोग करीता देण्यात येणारे औषध पूर्णपणे सुरक्षित असून ही व्यक्तिंच्या उंचीनुसार दिली जाणार आहे. क्युलेक्स डासाची मादीने हा आजार पसरत असून गोळया खाल्यास आपण सुरक्षित राहू शकतो.

यावेळी डॉ. कुणाल मोडक यांनी डासांची उत्पत्ती व प्रतिबंधाकरीता विविध उपाय यावेळी सांगितले. अस्वच्छ ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होत असून पाणी घराजवळ जमा होऊ न देणे. घराजवळ स्वच्छता ठेवणे असे सांगितले. पाणी थांबलेल्या ठिकाणी डास मादी ही अंडी देत असते. व नंतर त्याचे डासामध्ये रुपांतर होऊन शरीरात चावलेल्या ठिकाणी आपल्या शरीरात शिरकाव होऊन शरीरात कृमी तयार होत असतात. व शरीरातील एखादया ठिकाणची जागेमध्ये सुज येत असून त्या ठिकाणी कृमी मोठे होत असतात.
डासांपासून बचाव करण्यासाठी शरीर पूर्ण झाकले जाईल तशा प्रकारचे कपडे घालणे. दारांना खिडक्यांना जाळी लावणे.

हत्तीरोगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्धी करण्यात येणार असून ठिकठिकाणी बॅनर लावले जाणार आहेत. घरोघरी तसेच शासकीय कार्यालय येथे जाऊन गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी हत्तीरोगाचे देण्यात येणाऱ्या गोळया पूर्णपणे सुरक्षित असून जनतेनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व गोळयांचे सेवन करावे. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन केले स्वागत

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

 

Comments are closed.