Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आधुनिक भारताचे रचनाकार म्हणजे नेहरू –  मिलिंद खोब्रागडे

तालुका काँग्रेस आरमोरी तर्फे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आरमोरी, 14 नोव्हेंबर :- तालुका काँग्रेस आरमोरी तर्फे आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना म्हणाले की, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घरीच केले, पुढील शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, गांधीजींचा चळवळीचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला होता.  म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उड़ी घेतली 1930 च्या दांडी यात्रेत ते सहभागी झाले. 1942च्या लढाई ते आघाडीवर होते त्यांना अनेक वेळा तुरुंगास भोगाव लागला. पंडितजी स्वतः श्रीमंत कुटुंबात जन्मले परंतु त्यांनी भारतातील दारिद्र्य नष्ट करण्याचा ध्यास घेतला. त्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले त्यांनी भारतातील शेतीचा विकास केला. त्यांनी भागात मोठमोठे कारखाने काढण्यात मदत केली पंडितजींना मुले खूप आवडायची म्हणून 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करतात असे भारताचे भाग्यविधाते पंडित नेहरू यांचा 1964 साली निधन झाला. अश्या विविध त्यांच्या कार्यावर त्यानी प्रकाश टाकला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर ‘बालक दिन’ साजरा करताना शेगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन चे वाटप करून त्यांना आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी कार्यक्रमात काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, अशोक वाकडे, माजी सभापती प.स.तालुका उपाध्यक्ष विजय सुपारे, सुदाम मोटवानी गटनेता नगरपरिषद, निर्मलाताई किरमें, नगरसेविका न.प. आरमोरी. नगरसेविका दुर्गाताई लोणारे, शशिकांत गेडाम, एड. विजय चाटे, अनिल किरमे, भीमराव बारसागडे, नीलकंठ सेलोकर, विद्याताई सपाटे, किशोर मश्या खेत्री, सुरज भोयर, तीर्थराज मैंद, निलेश अंबादे, गोविंदा ढोरे, गोलू कुथे, रुपेश जवंजालकर, अजय नारनवरे, महेश गिरडकर, कैलास टिचकुले, रामहरी वाडगुरे, मेघराज राऊत, नितीन कोल्हे दुष्यंत मेश्राम, हर्षल खोब्रागडे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.