Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपराजधानीतील वन खात्याचे मुख्यालय होणार मंत्रालयात स्थलांतर

मंत्रालयात हालचालीला आला वेग

नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला तेव्हाच काही विभागाची मुख्यालये ही नागपुरात असावी, असा आग्रह धरला होता. आधी वनखात्याचे मुख्यालय पुण्यात होते. तत्कालीन वनमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या कार्यकाळात एप्रिल १९८७ मध्ये ते नागपुरात हलवण्यात आले. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या कार्यकाळात हे मुख्यालय पुण्यात हलवण्याचा हालचाली सुरू झाल्या. त्यात त्यांना यश आले नाही. आता पुन्हा हे मुख्यालय मुंबईत हलवण्याचा प्रस्ताव तयार झाला असून एप्रिल २०२३ मध्ये ते मुंबईत स्थानांतरित होण्याची दाट शक्यता वनखात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर 30 जानेवारी :-  उपराजधानीतील वनखात्याचे मुख्यालय पुन्हा मुंबई मंत्रालयात पळवण्याचा घाट घातला जात आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव देखील तयार केला असल्याची खत्रिदायक वृत प्राप्त झाले असून मंत्रालय स्तरावर हालचाली दिसून येत आहे. यापूर्वी देखील तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या काळात कार्यालय पुण्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला होता. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), त्यांच्या अंतर्गत असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्मिक व दुय्यम संवर्ग आणि विशेषकरून नोडल अधिकारी (एफसीए) ( विविध वनेत्तर उपयोगासाठी जमीन वाटप करणारे कार्यालय) ही प्रमुख कार्यालये मुंबईला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यावर आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होणे बाकी आहे. वनबलप्रमुख हे राज्याच्या वनखात्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचे स्थलांतर होण्याचे संकेत स्पष्ठ झाले असल्याने सर्वच कार्यालय मंत्रालयात स्थलांतर होणारं असे बोलले जात आहे.

नियोजन आणि विकास विभागाचे नुकसान भरपाई देणारी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणमध्ये विलीन करण्याची योजना देखील सुरू आहे. संरक्षण आणि आयटी विभागही विलीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यालयातील वनकर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे. जमिनीचे प्रकल्प मोकळे करण्यासाठी हे कार्यालय मुंबईला नेण्याचा घाट काहींनी घातल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर काहींनी भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या शहरात नियुक्ती हवी असल्याने त्यांनी हा घाट घातला असावा? सध्या वनखात्यात सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी, विभागीय वनाधिकारी अशी अनेक पदे रिक्त असल्याने विलीनीकरणाचा मार्ग अवलंबला असावा, असेही काहींनी सांगितले. दरम्यान, या स्थानांतरणावर वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांत कमालीची असवस्थता दिसून येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.