मुंबईमध्ये ग्रीड फेल झालेली घटना सायबर अटॅक नाही – भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
अधिवेशनच्या तोंडावर अपयश लपविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा केविलवाणा प्रयत्न – माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्र परिषदेत आरोप.
नागपूर डेस्क, दि. २ मार्च: १२ ऑक्टोबर ला मुंबईमध्ये ४ तास तर काही ठिकाणी १२ तास वीज खंडित होऊन मुंबई बंद होती आणि या प्रकरणामध्ये गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी स्वतःची पाठ थोपटवून घेण्याकरिता चीनने काहीतरी सायबर अटॅक केला आणि म्हणून आमचं ग्रीड फेल झालं असा एका कपोलकल्पित बातमी तयार केली आणि त्या रिपोर्टचा आधारावर महाराष्ट्राच्या मुंबईच्या जनतेला मूर्ख बनविण्याच काम दोन्ही पक्षांनी केला असा आरोप राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
एका रिपोर्टच्या आधारावर पत्रकार परिषद घेतात पण पत्रकार परिषद घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती न घेता अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्याच हे मोठ कारस्थान या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. असेही ते म्हणाले. हे मॅनुअली झालं आहे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले आहे. सायबर अटॅक नाही हे शक्य नाही असा दावा त्यांनी यावेळेला केला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
Comments are closed.