Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिनेमातील गुन्हेगारी दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवावी आणि सामाजिक परिवर्तनाच्या सिनेमांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मल्टीप्लेक्स सिनेमा घरातील तिकट दर कमी करावे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

दिल्ली दि. 27 जुलै :  सिनेमाघर ,छोट्या पडद्यावरिल मालिका,टिव्ही चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म आदि माध्यमांवर दाखवण्यात येणारे चित्रपट, मालिकांमधून गुन्हेगारी विश्वाचे अनेक प्रसंग,कथा अधिक प्रमाणात दाखविण्यात येतात; त्यातून समाजमनावर त्याचे प्रतिबिंब उमटते.नव्या पिढीवर चुकीचे संस्कार नकळत घडले जातात.त्याचे अनुकरण युवापिढीकडून केले जाते.परिणामस्वरुप समाजात गुन्हेगारी वाढत जाते; ते रोखण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील गुन्हेगारी प्रसंगाना कात्री लावली पाहिजे.तसेच समाजावर चांगले संस्कार घडवणाऱ्या सामाजिक आशयाच्या,सामाजिक परिवर्तनाच्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी संसदेत केली.

सिनेमा ऑटोग्राफ अमेंडमेंट बिल 2023 वर आज राज्यसभेत झालेल्या चर्चेत ना.रामदास आठवले यांनी आपले विचार मांडले.त्यावेळी ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या सोशल मिडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि छोट्या पडद्यावर अधिक सिनेमे पाहिले जातात.पुर्विसारखे मोठ्या पडद्यावर सिनेटॉकिज मध्ये चित्रपट अधिक पाहिले जात नाहीत.आता मल्टीप्लेक्स चित्रपट गृहामध्ये मोठ्या प्रमाणावर सिनेमा पाहिला जातो.मात्र या मल्टीप्लेक्स सिनेमा घरात तिकिटांचे दर अतिप्रमाणात महाग असतात.सर्व सामान्य माणसांना ते तिकिट दर परवडले जात नाहीत.या मल्टीप्लेक्स मधिल तिकिट दर क़मी करावे अशी मागणी संसदेत ना.रामदास आठवले यांनी केली.

मी लॉसएंजिलेस(अमेरिका) येथील हॉलिवुडला भेट देऊन आलो आहे. जगात नोंद असलेले बॉलिवुड मुंबईत आहे.बॉलिवुड मध्ये सामाजिक आशयाच्या चित्रपट निर्मितीला प्राध्यान्य मिळेल.याकडे सेन्सॉर बोर्डाने लक्ष द्यावे.असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.