Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निष्ठावतांच्या आगीची मशाल हाती …

मशाल पुन्हा इतिहास घडविणार ! शिवसेनेला दृढ विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 11 ऑक्टोबर :-  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह देण्यात आलं. आता अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गट भाजप-शिंदे गट युतीविरोधात ‘मशाल’ हाती घेऊन उतरणार आहे. तसं पाहता मशाल हे चिन्ह शिवसेनेला नवीन नाहीये. कारण यापूर्वी शिवसेनेनं मशाल चिन्ह हाती घेऊन इतिहास घडविला आहे.

मशाल आणि शिवसेनेचं नातं हे ३७ वर्ष जुनंच आहे. १९८५ साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. याच चिन्हाच्या जोरावर बाळासाहेबांनी महापालिकेत शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आणले होते. छगन भुजबळ यांनीही त्यावेळी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. या चिन्हाच्या जोरावर भुजबळ पुढे शिवसेनेकडून आमदार म्हणूनही निवडून आले होते. महापालिकेत ७४ नगरसेवक निवडून आल्यानंतर मशालीने इतिहास घडवत सत्ता स्थापन केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे दावे फेटाळून लावत, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक लढवण्यासाठी मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. तर शिंदे गटाला अजून चिन्ह मिळालेलं नाहीये. याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे हे नाव दिलं तर शिंगे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता पुन्हा यापूर्वीच्या मशाल चिन्हाची चर्चा होत आहे. शिवसेनेने देखील त्यांच्या ट्विटर हॅंडलवर ठाकरे गटाचा लोगो शेअर केला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन पर्यायी चिन्हांचा इमेल

Comments are closed.