Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर येथील धबधबा पर्यटकांना मारतोय डोळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

सुधागड, 3 ऑगस्ट 2023 ; पाली पासून 3 कि.मी. अंतरावर असलेले रस्त्यालगत सिद्धेश्वर हे गाव आहे. गावात प्रवेश करताच प्रथम पूर्वमुखी मारुतीचे मंदिर आहे.नंतर दक्षिणेस मुखी ग्रामदैवत बापूजी मंदिर आहे. पूर्वेस 350 वर्षांपूर्वीचे यादव कालीन स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. या मंदिरापासून 15 मी. अंतरावर हा धबधबा आहे.

धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार दाट झाडी आहे. जाताना रस्त्यात झुळझुळ वाहणारा ओढा आहे. त्या ओढ्यातून पलीकडे जाण्याची मजा वेगळीच. पुढे जान्यासाठी असलेल्या वाटेवर निसर्गाने हातरलेली दाट हिरवीगार गवताची जणू काय चादरच आहे असे जाणवते. धबधब्याच्या जवळ जाताच सभोवताली सह्याद्रीच्या रांगा असलेले पर्वत, घनदाट जंगल यांच्यामध्ये तुडुंब भरलेले धरण पर्यटकांना आकर्षित करतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या धरणातून 20 फुटांवरून ओसांडून वाहणारा पांढरा शुभ्र धबधब्याचा दोन्ही बाजूला असणारी हिरवी गार झुडप यातून वाहणारे पाणी पर्यटकांचे मन मोहून घेणारे हे दृश्यच पर्यटकांना भुरळ पाडते. या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटकांची नेहमी येथे गर्दी करत करीत असतात. शनिवारी व रविवारी व सुट्टीच्या दिवशी मन मोहून टाकणारे निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक येतात.

थोडी खबरदारी व अति उत्साह टाळल्यास शाळकरी लहान मुले, महिला व तरुणांसाठी हे सुरक्षित ठिकाण आहे. यामुळे मुंबई, ठाणे, तसेच इतर तालुक्यातून पर्यटक देखील आगळी वेगळी मजा घेण्यासाठी हिरव्यागार झाडाझुडपानी दाटलेल्या या ठिकाणी आवर्जून येतात आणि येथील निसर्गरम्य वातावरण बघून निसर्गाशी एकरूप होतात. आशा प्रकारे पर्यटकांना खुणावतोय सिद्धेश्वर येथील धब..ध…बा….

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.