Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर येथील पडोली स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून 14 लाख केला चोरट्यांनी लंपास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर 20 फेब्रुवारी :- चंद्रपूर शहरालगत पडोली येथे धक्कादायक घटना, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून 14 लाख लांबविले,  चंद्रपूर शहराच्या एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात आहे पडोली एसबीआय बँक शाखा, चोरट्यांनी रात्री मागच्या बाजूस असणाऱ्या खिडकीचे गज कापून आत केला प्रवेश, सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगीत स्प्रे मारून कॅमेरे केले निष्प्रभ, त्यानंतर गॅस कटरने तिजोरी कापून आतील रक्कम लांबविली, सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लांबविला, चंद्रपूर पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल झाल्यानंतर पोलिसांपुढे हे प्रकरण उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान.

चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून 14 लाख लांबविले. चंद्रपूर शहराच्या एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात ही पडोली एसबीआय बँक शाखा आहे. चोरट्यांनी रात्री मागच्या बाजूस असणाऱ्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगीत स्प्रे मारून चोरट्यांनी कॅमेरे निष्प्रभ केले. त्यानंतर गॅस कटरने तिजोरी कापून आतील रक्कम लांबविली. चोरट्यांनी जाताना सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील लांबविला. सकाळी बँक कर्मचारी शाखेत आल्यावर पोलिसांना याबाबत तक्रार देण्यात आली. पडोली पोलीस, चंद्रपूर पोलीसांचे गुन्हे शाखा पथक यांच्यासह पोलिसांची विविध पथके तपासकामी लागली आहेत. चंद्रपूर पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल झाल्यानंतर पोलिसांपुढे लगेच ही धाडसी बँक चोरी झाल्याने पोलिसांपुढे प्रकरण उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिलाय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.