Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वरूड परिसरात चोरांनी केले मंदिर टार्गेट

मंदिर फोडी करणारा चोरटा अमरावती पोलिसांच्या ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती 13 ऑगस्ट :-  अमरावती ग्रामीण जिल्ह्यात मंदिर चोरीच्या घटना घडत असल्याच पोलिसांच्या निदर्शनास आल. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मंदिरात चोरी करून, इतर साहित्य चोरून आणि वस्तूंची नासधूस करण्याच्या घटना समोर येत होत्या.

या सर्व घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपी शोधण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शक सूचना दिल्या. या आदेशावरून स्थागुषा येथील पथकाने मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी चे प्रयत्न सुरू केले. या दरम्यान पांढरघाटी ता. वरूड येथील गोपाळ मोहन इवनाते वय ३८ यांना पोलिस स्थानक वरूड हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मंदिरातील चोरी केल्याचा गोपनीय खबर मिळाल्या वरून संबंधित आरोपीस अगदी शिताफीने ताब्यात घेऊन आणि विश्वासात घेऊन त्याला मदिर चोरीच्या सदर्भात विचारपूस केली. आणि आरोपीने वरुड शहरातील सती माता मंदिर, हनुमान मंदिर,आनंद महाराज समाधी मंदिर व लिंगा येथील दादाजी धुनीवाले यांचे मंदिरातील चोरी केल्याबाबत स्वतः कबुली दिली. यावरून आरोपी यांच्याकडून पोस्टे वरुड येथील दाखल असलेल्या मंदिर चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. सोबतच मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. ताब्यात असलेल्या आरोपीवर पुढील कारवाई पोस्टेवरून यांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संबंधित घटनेची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पुनीत कोल्हे यांच्या नेतृत्वात बहुपदी नितीन चुलपार अमलदार संतोष मुंदाने, रवी बावणे बळवंत दाभणे, दिनेश कनाशिया पंकज पाटे चालक नितेश तेलगोटे व सायबर सेल यांनी सर्वांनी मिळून संबंधित घटनेच्या आरोपीला घेतले ताब्यात. तरी यामगील आणखी कोणी सूत्रधार आहे का! यासाठी पोलिसाचा तपास सुरू आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.