Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अहेरी येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी  26 जानेवारी :- अहेरी येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अहेरी नगरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले व ठिकठिकाणी प्रत्येक शाळा व कार्यालयात तिरंगा फडकविण्यात आला, माझी आमदार राजे अमरीश राव महाराज, व त्याचप्रमाणे अवधेश राव बाबा यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी रॅली अहेरी नगरातून भ्रमण करत दानशूर चौकात पोहोचली व त्याचप्रमाणे अहेरी सोबत धर्मराव कृषी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, व त्याचप्रमाणे कैलासवासी चंद्रभागाबाई मद्दीवार शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी व त्याचप्रमाणे अहेरी नगरातील सर्व नागरिकांनी भाग घेतलेला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रॅलीत प्रचंड गर्दी झाली होती, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी स्थानिक जिल्हा उप रुग्णालयात, मुस्लिम युवा समितीच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आला त्यात डॉक्टर राहुल, पोलीस उपनिरीक्षक आदरणीय बालाजी चव्हाण सर यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले व अहेरी मुस्लिम युवा मंचाचे सर्व सदस्य सुद्धा उपस्थित होते.  याप्रसंगी राहुल सर व चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज अहेरी नगरात क्रिकेट रसिकांसाठी स्थानिक स्नेहालान व त्याचप्रमाणे पटवर्धन ग्राउंड येथे सुद्धा क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, व प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन होत आहे.

Comments are closed.