Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन जहाल नक्षल्याच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

28 जुलै नक्षल सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 24 जुलै – गडचिरोली जिल्ह्यात 28 जुलै ते 03 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी हे नक्षल शहिद सप्ताह पाळतात. या सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, जनतेकडुन पैसा वसूल करणे, ठेकेदाराकडुन खंडणी गोळा करणे इ. हिंसक कारवाया करत असतात.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच एकुण 08 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे अडमा जोगा मडावी, वय 26 वर्ष रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व टुगे कारु वड्डे, वय 35 वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षल्यांनी का केलं आत्मसमर्पण

1) दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.
2) वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
3) दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.
4) पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.
5) खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
6) नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने केले बक्षीस जाहीर

1) महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याचेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
2) महाराष्ट्र शासनाने टुगे कारु वड्डे याचेवर 2 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

1) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अडमा जोगा मडावी यास एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
2) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन टुगे कारु वड्डे याला एकुण 4 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

माओवादी जसे सांगत आले की, आमचा लढा हा जनतेसाठी आहे, तो कधी जनतेसाठी नव्हताच. सप्ताहाच्या नावाखाली गरीब आदिवासींची पिळवणूक करणे, ठेकेदारांकडुन खंडणी गोळा करणे, वर्चस्व गाजवणे, देशविघातक कृत्य करणे यासाठीच फक्त त्यांचा लढा आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दल सर्व जनतेला आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट¬ा व फसव्या तथाकथीत क्रांतीला बळी पडू नये. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 सालामध्ये आतापर्यंत एकुण 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.