Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत, भिवंडी महानगरपालिकेचे शहर वार्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 10 नोव्हेंबर :-   केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धरतीवर महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० हा कार्यक्रम महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येणार असून , सर्वच महानगरपालिका अंतर्गत शहर वार्ड, सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन आपले शहर वार्डाचे, सौंदर्यीकरण करुन भिवंडी शहरामध्ये स्वच्छता व सौंदर्यीकरणासंबंधी कामाचे नियोजन करुन भिवंडी कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नुकताच एका आदेशाव्दारे स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.

महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी या शहर, वार्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेबाबत माहिती देताना सांगितले की,ही स्पर्धा एकूण १२ घटक व निकषांवर आधारित असून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता व सौंदर्यीकरण या दोन परस्पर पूरक घटकांवर काम करून, कचरा मुक्त शहराच्या वाटचालीत शहरांना गतिमान करण्यासाठी दिनांक २ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या कालावधीसाठी ही स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण त्रयस्थ संस्थांमार्फत जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणार आहे, यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ड वर्ग महानगरपालिकांमधून शासनाकडून प्रथम क्रमांकास १५ कोटी ,द्वितीय क्रमांक १० कोटी व तृतीय क्रमांक ५ कोटी रुपयांची बक्षीसांची रक्कम समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, वार्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्तरावर बक्षीस निश्चित करून मनपाच्या स्वनिधीतून बक्षीस देण्याचे आणि केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत ३२० गुणांसाठी ही स्वच्छ वार्ड स्पर्धा घेतली जाणार असल्याचे सांगून, भारत अभियान (नागरी) २.० सर्वेक्षण २०२३ अंतर्गत होणार असल्याचे शासनाचे निर्देश असल्याचे सांगितले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या स्पर्धेसाठी महानगरपालिका स्तरावरील वॉर्डाच्या स्वच्छतेकरीता व त्यांच्या निकषांची तपासणी करून गुणांकन करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार असून, या समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त आयुक्त) हे असणार आहेत. समिती सदस्य दीपक झिंजाड (उपायुक्त – आरोग्य ) सुनील घुगे + शहर अभियंता), एल.पी.गायकवाड (कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा), अनिल येलमाने (सहाय्यक संचालक – नगररचना), नूतन खाडे (उपायुक्त- शिक्षण), अनुराधा बाबर (सहा.आयुक्त – शिक्षण), प्रीती गाडे (सहा.आयुक्त – आरोग्य तथा समिती सचिव) जे. एम. सोनवणे (आरोग्य अधिकारी), तसेच भिवंडी शहरातील अभियांत्रिकी /वास्तू विशारद संघटना, प्रजापती ब्रह्मकुमारी संस्था, रोटरी क्लब ऑफ इंडिया,प्राचार्य – इंडियन मेडिकल असोसिएशन, मे अद्वैत मल्टिव्हेंचर अशा अशासकीय संस्थांचे सदस्य सदस्य म्हणून या समितीवर नियुक्त करण्यात आलेले आहेत.

भिवंडी कचरा मुक्त करण्याच्या या स्पर्धेमधील घटक व दिलेले निकष पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्व प्रभाग अधिकारी, सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व विभाग प्रमुख आणि प्रभागातील आरोग्य निरीक्षक, कर्मचारी यांनी शहर स्वच्छतेचे काम चोखपणे करण्याबाबतच्या सूचनाही मनपा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्पर्धेचे घटक निकष:-

१) १०० टक्के घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व वार्ड कचरामुक्त करणे (जीएफसी).
२) वार्ड मध्ये एकूण निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ओला व सुका कचरा या स्वरूपात वर्गीकरण करणे.
३) १०० टक्के रस्त्यांची सफाई,बाजार परिसरात लिटर याबीन्स, कचराकुंडी मुक्त वार्ड करणे.
४) होम वेस्ट कंपोस्टिंग आणि बल्क वेस्ट जनरेटर प्रक्रिया करणे.
५) वार्ड मध्ये प्लॅस्टिक बंदी करणे.
६) वार्डमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे.
७) वार्ड सौंदर्यीकरण करणे.
८) नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे.
९) चौक सुशोभीकरण व शिल्पे, कारंजे उभारणी करणे.
१०) वॉर्ड मधील पदपथावरील तसेच इतर ठिकाणावर असलेल्या बाकांवर आणि तत्सम फर्निचर (स्ट्रीट फर्निचर) एकसंधपणा यांच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे. (प्लेस मेकिंग)
११) वार्डातील किमान चार झिरो वेस्ट उपक्रम घेणे.
१२) वार्डातील स्वच्छता चॅम्पियन यांचा सत्कार कार्यक्रम करणे

हे देखील वाचा :-

Comments are closed.