Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी मध्ये 50-50 टक्के सूट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि.१८:- राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्या शनिवार 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. यामध्ये शहरी भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी मध्ये 50-50 टक्के सूट देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केंद्रावर नोंदणी करून लसीकरण दिले जाणार आहे. उद्या जिल्ह्यातील 30 लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध होणार असून सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध होणार आहे. पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे आव्हान : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने यामध्ये लसीकरणासाठी वयोगट निश्चित केला जात असून सध्या 30 व त्यावरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आली आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असून या ठिकाणी गर्दी न करण्याचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. लसीकरण केंद्रावर शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आवश्यकतेनुसार करणे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लसीकरणाचे केंद्र खालील प्रमाणे- 

ग्रामीण रुग्णालय गडचिरोली, प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला, बोदलीं, अमिर्झा, पोटेगाव, गोकुळनगर, वळसा, सावंगी, कुर्द, कोरेगाव, चामोर्शी, भेंडाडा, कुंघाळा, आमगाव, कोंसरी, मार्कंडा आरमोरी, वर्धा, देलांवडी, वैरागड, खारवंडी, कुरखेडा, देवुळगाव, कढोली, मालेगाव, अहेरी, महागाव, कमलापुर, कोरची, बोटेकासा इत्यादी ठिकाणी सकाळी 9ते 5 दरम्यान लसीकरण होणार आहे.

Comments are closed.