Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे – शरद पवार

'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा'] दोन दिवसाच्या शिबीराची सांगता 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

शिर्डी,  06 नोव्हेंबर :-  लहान – लहान कार्यकर्त्यांनी काम केल्याने परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी व्यक्त केला. ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवार यांनी तब्बेतीमुळे थोडक्यात मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे उत्तमरीत्या शिबीर झाले आहे. अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी हॉस्पिटलमध्ये मिळाली. शिस्तबध्द पध्दतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटील यांनी आयोजित केले. त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता पुढे युवक, युवती, महिला, सर्व सेलचे घटक काम करत आहेत त्यांचेही स्वतंत्र शिबीर आयोजित करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हॉस्पिटलमध्ये सर्वच भाषणे ऐकली असं नाही पण काहींची ऐकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा – पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यानंतर मला काम करता येणार आहे असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या तब्बेतीमुळे त्यांचे विचार माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी यावेळी वाचून दाखवले.

महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे  – जयंत पाटील

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सरकार गेलं की चिंता करायची नाही. एवढं काम करु की महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे. आम्हाला हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. त्यामुळे आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. शिबीरात शेवटच्या दिवशी जयंत पाटील यांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन यावेळी मांडले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.

येणार्‍या काळात पक्ष नक्की एक नंबरचा बनेल, बळकट होईल – प्रफुल पटेल

महाविकास आघाडीचे जनक पवारसाहेब आहेत. तेच आपला आदर्श असताना राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर का झाली नाही हा मंथनाचा विषय आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले. एक नंबरचा पक्ष करायचा असेल तर त्यांचा विचार नक्कीच घराघरात पोहोचवला पाहिजे. येणार्‍या काळात पक्ष नक्की एक नंबरचा बनेल, बळकट होईल असा विश्वास खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. २०१४ पासून राजकारणाची दिशा बदलली आहे. या बदललेल्या राजकारणात टिकायचे असेल तर त्यानुसार परिवर्तन करायला हवे असे मत खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत ;ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? – छगन भुजबळ

ईडीने कारवाई केलेल्या यादीत एकही भाजप नेते नाहीत. ते फक्त धुतल्या तांदळासारखे आहेत का? केंद्रीय यंत्रणा या स्वतंत्र आहेत असे सांगता हा काय दांभिकपणा आहे. तुमच्याकडे गेल्यावर शुभ्र कसा होता. शिखंडीसारखे का लढता असा संतप्त सवालही छगन भुजबळ केंद्रसरकारला केला. ईडीची कारवाई का तर लवकर जामीन नाही म्हणून… नवाब मलिक, अनिल देशमुख यांची काय केस आहे हे सर्वांना माहीत आहे ते नक्की बाहेर येतील असे सांगून पवारसाहेब आपल्या कार्यकर्त्यांना एकटं सोडत नाहीत असेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.

मिडिया व राजकीय लोकांमध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे – खासदार सुप्रियाताई सुळे

पक्षासाठी केसेस अंगावर घेतात त्या सर्व युवकांचे आभार सुरुवातीलाच आपल्या भाषणात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी मानले. राजकारणात चांगली पॉलिसी यावी म्हणून मी संसदेत काम करत आहोत टिका करायची तेव्हा नक्की करतो पण पॉलिसीवर आम्ही जास्त लक्ष देतो असे सांगतानाच ५० हजार कोटी रुपये स्मार्ट सिटीवर खर्च केले तर जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च झाले मग या स्मार्ट सिटी झाल्या का? याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. रामाला आम्ही कधीच विसरलो नाही तो आपला अविभाज्य भाग आहे. हा पक्ष जमीनदारांचा नाही हा सर्व कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे व्यासपीठावर येऊन आपल्यावर कोण टिका करत असेल तर ते आम्हाला पटणार नाही अशा शब्दात आपली नाराजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली. प्रलोभन आणि धाक सध्या वाढत आहे. मिडिया व राजकीय लोकांचे चांगले संबंध असतात. त्यांच्यामध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा :-

Comments are closed.