Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गळफास लावून युवकाची आत्महत्या

अहेरीतील दुर्दैवी घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 09 नोव्हेंबर :-  आल्लापल्ली येथील श्रीराम मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात आज बुधवारी दुपारी एका युवकाचा दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे संपूर्ण आल्लापल्ली परिसरात सन्नाटा पसरला आहे. या युवकाने आत्महत्या का केली असावी याबाबत अजून तरी स्पष्ट कारण समजले नाही. नुकतेच त्याचे लग्न झाले होते असे समजते . या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.मृत युवकाचे नाव प्रमोद इगेवार – वय ३४ असे असून तो श्रमिक नगर वॉर्ड क्र.१ मध्ये आपल्या परिवारासह राहत होता.युवकाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली ते अद्याप स्पष्ट नसले तरी अहेरी पोलीस पुढील तपास करीत आहे.
या युवकाचे ६ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव व पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे.अधिक तपास अहेरी पोलीस करीत आहेत. तपासाची योग्य दिशा सापडल्यावर ही आत्महत्या या युवकाने का केली हे स्पष्ट होईल. मात्र या घटनेने संपूर्ण आल्लापल्ली परिसरात दुःखद वातावरण पसरले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.