Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत नृत्य परिषदेतर्फे युवती महोत्सव !

  • युवतींचे नृत्यात उत्कृष्ट सादरीकरण .
  • रांगोळी स्पर्धाही घेण्यात आले.
  • युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी १५ मार्च : येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे नवीन इमारतीच्या सांस्कृतिक दालनात नृत्य परिषद, गडचिरोली शाखा अहेरीच्या वतीने रविवार १४ मार्च रोजी युवती महोत्सव घेण्यात आले. यात युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पूर्णपणे कोरोनाचे नियम पाळण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


युवती स्पर्धेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात उदघाटनस्थानी नृत्य परिषदेचे जिल्हाध्यक्षा प्रेरणा गारोदे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोरंजन मंडल होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य धीरज महंत, प्रा.डॉ.विजय खोंडे, नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, जयश्री खोंडे, अहेरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र अलोने,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अहेरी  तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड डॉ.लोचन उमाटे, लक्ष्मण शेडमाके, प्रकाश दुर्गे( जेष्ठ पत्रकार) , अशोक पागे, सुजित निंबेकर, राकेश सोनकुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा


याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य मनोरंजन मंडल यांनी, युवक व युवतींनी आपले उज्जवल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणासोबतच कला गुणांचे आत्मसाद करणे गरजेचे असून कला व सांस्कृतिक क्षेत्रातूनच व्यक्तीचा व परिसराचा सर्वांगीण विकास होत असतो असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले.


उदघाटन स्थानावरून नृत्य परिषदेचे जिल्हाध्यक्षा प्रेरणा गारोदे यांनी, आदिवासी बहुल, दुर्गम व अतिमागासल्या भागातील युवक व युवतींमध्ये कला व सुप्त गुण आहेत परंतु पाहिजे तसे व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने नृत्य परिषदेच्या माध्यमातून कलाकारांचे भवितव्य उंचावण्यासाठी धडपड करीत असल्याचे म्हणत मोठ्या संख्येने नृत्य परिषदेत सामील होण्याचे यावेळी आवाहन केले.


तर याचवेळी युवती प्रमुख जयश्री खोंडे, लक्ष्मण शेडमाके, सुरेंद्र अलोने, सुजित निंबेकर आदींनी सुद्धा नृत्य व कला गुणांविषयी आपले विचार प्रकट केले. युवती महोत्सवाच्या समूह नृत्यात प्रथम पारितोषिक माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्यातर्फे पाच हजार एक रोख रक्कम तर द्वितीय पारितोषिक तीन हजार एक रुपये रोख रक्कम प्रा.डॉ.विजय खोंडे यांच्यातर्फे होते.


तसेच एकल नृत्यात तीन हजार एक रुपये रोख रक्कम राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे तर द्वितीय पारितोषिक मुख्याध्यापक संजय कोडेलवार यांच्या तर्फे दोन हजार एक रोख रक्कम होते. समूह नृत्यात प्रथम क्रमांक डाजलर डान्स ग्रुप यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक डी. गर्ल्स ग्रुप यांनी मिळविला. कुंजन आर्या ग्रुप यांनी तिसरा क्रमांक पटकाविले. तर प्रोत्साहन बक्षीस पूर्वा दोंतुलवार व रचना बोमकंटीवार यांनी प्राप्त केले.


एकल नृत्यात प्रथम क्रमांक तनुश्री वेलादी तर द्वितीय साहिल शेख यांनी तर तृतीय क्रमांक क्षितिजा पुद्दटवार यांनी पटकाविला. प्रोत्साहन पर बक्षीस स्नेहल कुत्तरमारे यांनी मिळविले. 6 ते 14 वयोगटातील ग्रुप बी मध्ये प्रथम खुशी येनगंटीवार,द्वितीय अवनी मुळावार तर तृतीय क्रमांक अवनी दोंतुलवार यांनी पटकाविले तर प्रोत्साहन पर बक्षीस सर्वेक्षा चव्हाण यांनी मिळविले. या स्पर्धेचे मूल्यमापन शिला चौधरी व गोपाल कोडापे यांनी केले.


युवती महोत्सवातच सकाळच्या सत्रात कला विषयातून रांगोळी स्पर्धाही घेण्यात आले यात प्रथम क्रमांक शिवानी मीचा, द्वितीय स्वार्थीका कलीकोटावार तर तृतीय क्रमांक श्रीनिवास कविराजवार यांनी पटकाविले होते. रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण व मूल्यमापन मंगला निखाडे, मनीषा कारेंगूलवार अंकिता खंडाळे यांनी केले. नृत्य व रांगोळी स्पर्धेत युवतींनी उत्कृष्ट सादरीकरण केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक, सन्मानपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
युवती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र ठाकरे, कांचन देशपांडे, मंगला भरतकर, भाविका मेहता, आकाश सिडाम, कुणाल मेश्राम, उदय सिडाम, संदीप पोलमपल्लीवार, सावंत कोसरे, दुलेश मैलारपवार, अभिषेक मादासवार,प्रज्वल गादासवार आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.