Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गॅस सिलिंडरचे दरात बदल

व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त,घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 1 जून – आधीच महागाईमुळे हाल झाले असताना आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या किमतींत  मोठी घट झाली आहे. एलपीजी  विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही  कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.

नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे, तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1856.50 रुपयांवरून 83.50 रुपयांनी कमी होऊन 1773 रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.