Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 12 फेब्रुवारी :- बहुचर्चित असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांना बदलण्यात आलं आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचंही नाव आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोण आहेत रमेश बैस:- 

रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.

1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.

छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते.

हे पण वाचा :-

Comments are closed.