Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 28 जून – भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात टोळ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यातून चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावले आहे. पण एक गोळी कंबरेला चाटून गेली आहे. आझाद यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सहारनपूरमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. कारचे काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी पोलीस महासंचालक विजय कुमार यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला असून आरोपींना तातडीने अटक करावी आणि आझाद यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आझाद यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असं आरएलडीचे स्थानिक आमदार मदन यांनी म्हटलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे हल्लेखोर कारमधून आले होते. हल्लेखोरांनी वापरलेल्या कारवर हरियाणा राज्याची नंबर प्लेट होती. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी गेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.