Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरच्या ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राची दारे 4 महिन्यांसाठी झाली बंद.

पावसाळ्यातील चार महिने गाभा क्षेत्रातील वन्यजीव पर्यटन असते बंद.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 01 जुलै – जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव वैविध्य. या प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी हजारो वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दरवर्षी दाखल होतात. 30 जून ही तारीख या व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील वन्यजीव पर्यटनाची अंतिम तिथि असते. एक जुलैपासून गाभा क्षेत्रातील वन्यजीव पर्यटनावर बंदी लावली जाते. यंदाही 30 जून रोजी गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद करण्यात आले आहे. आज शेवटच्या दिवशी मात्र सोनम वाघिणीने पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले.

एक ऑक्टोबर पासून गाभा क्षेत्रातील पर्यटन पुन्हा एकदा प्रारंभ करण्यात येते. असे असले तरी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर अर्थात बाह्यभागातील वन्यजीव सफारी सुरळीत सुरू राहणार आहेत. गाभा क्षेत्रातील वने व वन्यजीव वैविध्य बफर क्षेत्रातही अनुभवता येत असल्याने मागील काही वर्षात बफर क्षेत्रातील पर्यटन देखील पर्यटकांनी फुलून जाते. त्यामुळे पावसाळ्यात देखील आपण वन्यजीव पर्यटनाचा व व्याघ्र सफारीचा विचार करत असाल तरीही ताडोबातील जंगल आपले स्वागत करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.