दिल्लीहून विमानाने आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २८ नोव्हेंबर : दिल्लीवरून विमानाने आलेल्या ५७ प्रवाशांच्या चाचणीनंतर दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज शनिवारी आढळून आले. तसेच अमृतसर येथून आलेले्या
अमृृतसर-बिलासपूर एक्स्प्रेसमधील तीन प्रवासी कोरोनाबाधित आढळले.
राज्य शासनाच्या आदेशापासून नागपूर जिल्ह्यात दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व गोवा या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकरिता कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अमृतसर -बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस ही दिल्लीमार्गे बिलासपूरला जात असते. त्यामधून १ हजार ७१७ प्रवासी आले. त्यांच्यापैकी १७ प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नव्हते. त्यांची अँटीजेन कोरोना टेस्ट करण्यात आली. १४ प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर तिघांचा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना होम क्वोरेंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याप्रमाणेच दिल्लीहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यापैकी ५७ प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे कंत्राट खासगी संस्थेकडे देण्यात आलेले आहे. या संस्थेने केलेल्या चाचणीत दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना होम क्वोरेंटाईन राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Comments are closed.