Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्रासोबत हमीपत्र सादर करण्याची उमेदवारांना मुभा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ७ डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील ९ नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम-२०२१ जाहिर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजीच्या पत्रान्वये आता शासनाने नगर विकास विभागाचा सन २०२१ चा अध्यादेश क्रमांक १५, दिनांक ६ डिसेंबर २०२१ नुसार नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिण्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच  उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करणे शक्य व्हावे हेतूने नामनिर्देशनपत्राचा कालावधी दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आले असून उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा तसेच विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार; नगरविकास विभागाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

 

 

Comments are closed.