Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“लोकस्पर्श न्यूज” च्या नव्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गड़चिरोली दि १ जुलै : “स्पष्ट मत ठाम भूमिका” हे ब्रीद वाक्य घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या गडचिरोली येथील नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखत पार पडला. गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी प्रमुख पाहुणे गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप-अधीक्षक सुरेन्द्र गरड, गडचिरोली वन विभागाचे विभागीय वनाधिकारी सोनल भडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, समाजातील दुर्लक्षित, दुर्बल घटकांच्या न्याय हक्कांसाठी लोक स्पर्श न्युज नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. “स्पष्ट मत ठाम भूमिका” या ब्रीदवाक्याला शोभणारे अतिशय निष्पक्ष राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले वृत्तांकनाचे काम लोक स्पर्श च्या माध्यमातून सुरू आहे.

आज लोकस्पर्श न्यूजच्या गडचिरोली येथील नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोकस्पर्शचे मुख्य संपादक ओमप्रकाश चुनारकर, कार्यकारी संपादक मनोज सातवी, दूरचित्रवाणी कार्यकारी वृत्तसंपादक रवीकुमार मंडावार, वृत्त निवेदिका स्वाति केदारे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आनंद मांडवे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ते धनंजय पडशालवार, तिरुपती गोडसेलवार, अजय कुकुडकर उपस्थित होते.

मुख्य संपादक ओमप्रकाश चुनारकर यांनी ‘लोकस्पर्शच्या’ सहकाऱ्यांसह कुमार आशीर्वाद व सुरेन्द्र गरड यांचे. स्वागत केले. नंतर उद्घाटक श्री कुमार आशीर्वाद यांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

उद्घाटनानंतर छोटेखानी मनोगताद्वारे लोकस्पर्श न्यूज च्या वार्तामधून सर्वस्पर्शी स्पंदनाचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत, लोकस्पर्शची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा कुमार आशीर्वाद आशीर्वाद यांनी दिल्या.

 

bhimrao bhadke
Happy Birthday Dad… 🥳🎉..on this occasion we had inaugurated news portal naming “Loksparsh”. Supported n guidance by me n Monal… Hope it will be successful ahead.. Good Wishes to them..

 

Comments are closed.