Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२३ जून : आजचे दिनविशेष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आजचे पंचांग (बुधवार, जून २३, २०२१) युगाब्द :५१२३
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आषाढ २, शके १९४३
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१४
चंद्रोदय : १७:५३ चंद्रास्त : ०५:१४, जून २४
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०६:५९ पर्यंत
क्षय तिथि : चतुर्दशी – ०३:३२, जून २४ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ११:४८ पर्यंत
योग : साध्य – १०:०१ पर्यंत
करण : तैतिल – ०६:५९ पर्यंत
द्वितीय करण : गर – १७:१६ पर्यंत
क्षय करण : वणिज – ०३:३२, जून २४ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १२:३७ ते १४:१६
गुलिक काल : १०:५८ ते १२:३७
यमगण्ड : ०७:३९ ते ०९:१८
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१० ते १३:०३
अमृत काल : ०१:२१, जून २४ ते ०२:४६, जून २४
वर्ज्य : १६:४७ ते १८:१३

“निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी
यशवंत, नितीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, कीर्तिवंत, जाणता राजा”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला, कविराज भूषण औरंगजेबाची चाकरी सोडून स्वराज्यात परतले. राजस्थान मध्ये सर्व राजपूत राजे अंतर्गत कलह विसरून दुर्गादास राठोड यांच्या नेतृत्वात एकत्र आले, त्यांना एकीचे महत्व पटले, त्यांचा आत्मविश्वास वाढला व थोड्याच दिवसात विदेशी आक्रमकांनी राजस्थान सोडले. छत्रसाल बुंदेला शिवाजी राजांची चाकरी पत्करण्यास आले तर महाराजांनी त्यांचा आत्मविश्वास जागृत करून परत पाठविले. ते रायगडावरून परतले व विजयी झाले, बुंदेलखंडात स्वधर्माचे साम्राज्य उभे केले.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपूर्ण हिंदुराष्ट्रासाठी विजयाचा संदेश होता असेही म्हणता येईल. स्वराज्याचे सिंहासन व्यक्तिगत स्वार्थ, सन्मान यासाठी नव्हते तर रयतेच्या सुखासाठी होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजांची दृष्टी व्यापक होती, विदेशी आक्रमणांनी हिंदू धर्माची झालेली हानी त्यांना भरून काढायची होती. आई तुळजाभवानी, पंढरपूरच्या विठोबाचा अफझलखानाने केलेला अपमान याचा बदला त्यांनी खानाचा वध करून घेतला.

काशी विश्वेश्वराचा झालेला अपमानही त्यांना बघवत नव्हत

शिवाजी राजांचा अभ्यास दांडगा होता, त्यांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधान नियुक्त केले होते.
स्वराज्य निर्माण करणे जितके अवघड तितके ते टिकविणे अवघड हे जाणून राज्यकारभाराची घडी चोख लावण्यात आली होती. अश्या दूरदृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या छत्रपतींचा संपूर्ण हिंदुस्थानाला अभिमान आहे. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या वाक्याचा मतितार्थ राजांच्या संपूर्ण जीवनचरित्रात जाणवतो म्हणूनच रयतेच्या राजाला सहृदय वंदन व मानाचा मुजरा.
आज हिंदू साम्राज्य दिन आहे अर्थातच शिवराज्याभिषेक दिन – तिथीप्रमाणे

आज आंतरराष्ट्रीय विधवा दिन व संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे

“जहाँ हुए बलिदान मुखर्जी , वो कश्मीर हमारा है:”

श्री श्यामप्रसाद मुखर्जी – एक थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्यात प्रसिद्ध मुखर्जी घराण्यात झाला.

भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरुच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते उद्योग आणि पुरवठा मंत्री झाले. नेहरू-लिकायत अलीखान कराराचे निषेधार्थ त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा १९५० मध्येच राजीनामा दिला तथापि त्यांच्या कारकीर्दीत चित्तरंजन चलनशील यंत्र कारखाना व सिंद्री खत कारखाना हे दोन भव्य प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांनी सुरू होऊन भारताच्या औद्योगिक विकासात मोलाची भर पडली.

काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली . पक्षात पहिल्यापासूनच सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते जनसंघातर्फे लोकसभेवर निवडून आले.पुढे
ते महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष झाले आणि प्राचीन अवशेष घेऊन त्यांनी ब्रह्मदेश व कंबोडिया या देशांनी भेटी दिल्या.

त्यानंतर त्यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले.

या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. काश्मीर मध्ये त्याकाळात आवश्यक असणारे परवाने ( परमिट ) न घेता प्रवेश केला. ११ मे रोजी त्यांना स्थानिक राज्य सरकारकडून अटक झाली. त्यांनतर मात्र अटकेत असणाऱ्या डॉ. मुखर्जीचा गूढ रित्या मृत्यू झाला.जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला.
• १९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)

• १९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)

* घटना :
१७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
१८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
१९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
१९९८: दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

• मृत्यू :
• १७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर, १७२०)
• १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर ,१८३८)
• १९३९: आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर, १८८५ – चितल, अमरेली, गुजराथ)
• १९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन. ( जन्म: २३ मे , १९०६)
• १९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर , १९४६)
• १९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
• १९९०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल ,१८९८ )
• १९९४: नाटककार, साहित्यिक वसंत शांताराम देसाई यांचे निधन.
२००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर, १९२५ )
• २०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेविका निर्मला जोशी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै , १९३४)

* जन्म :
१८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर१९२९)
१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)
१९२० : संघ प्रचारक, जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते कर्नाटक सिंह खासदार श्री जगन्नाथ राव जोशी यांचा जन्म ( मृत्यू : १५ जुलै, १९९१ )
१९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.
१९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.

हे देखील वाचा  :

‘त्या’ ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू!, सहलीचा आनंद बेतला जीवावर

खा. नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर 

Comments are closed.