Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या करणाऱ्या 22 वर्षीय प्रियकराला अटक

लोकस्पर्श  न्यूज  नेटवर्क 

वृत्तसंस्था दि,२४ मार्च :-  लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ती राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातच हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने एका ट्युनिशियन नागरिकाला अटक केली आहे. लंडनमधील क्लर्कनवेल भागातील आर्बर हाऊसमधील स्टुडंट फ्लॅटमध्ये शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप आहे. हल्ल्यात १९ वर्षीय सविता थनवानी हिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या, मात्र तिचा मृत्यू झाला.

प्रियकराला केली पोलिसांनी अटक

माहेर आणि सविता रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले जाते. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी २२ वर्षांच्या माहेर मारुफेच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली होती. शनिवारी सविताचा मृतदेह सापडला, त्याच परिसरात माहेरला रविवारी अटक करण्यात आली.

“सविता लंडन विद्यापीठातील शिकत होती. मारुफे सवितासोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण तो विद्यार्थी नव्हता. तो ट्युनिशियाचा नागरिक आहे, मात्र त्याचा कोणताही निश्चित पत्ता नाही. शुक्रवारी ती प्रियकर मारुफेसोबत होती. ” असं या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

हे देखील वाचा ,

खुशखबर!!गडचिरोली पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी गृह विभागाची मंजुरी, पोलीस पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

आदिवासी रुढी, पंरपरा, नृत्य, कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘आदि महोत्सवाचे’ उद्घाटन

विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता

Comments are closed.