Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी:अखेर वनमंत्री संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 16 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड   यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारणार का? आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का?, पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. ‘संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा.कारण एकाने ‘मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं’ असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी’ अशी मागणीही दरेकर यांनी केली.

Comments are closed.