Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश.

नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केली आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे  23 फेब्रुवारी :- विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलन गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची त्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आश्वासन देऊनही एमपीएससीची परीक्षा पद्धती बदलली नव्हती. त्यामुळे पुण्यातल्या परीक्षार्थींना पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी नव्या अभ्यासक्रमाबाबत आंदोलन छेडले होते. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे यंदा एमपीएससीला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय जाहीर करताच पुण्यातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आंदोलकांच्या नक्की मागण्या काय?

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख 4 मागण्या आंदोलकांच्या आहेत.

आंदोलकांचा नव्या पद्धतीला विरोध नसून त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीला विरोध होता. साधारणपणे दर 10 वर्षांनी परीक्षा पद्धतीत बदल होतो. याआधी 2014 पर्यंत एमपीएससीची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीनंच होत होती. 2014 ते 2023 पर्यंत तीचं स्वरुप पर्यायवाचक झालं. आता 2023 मध्ये पुन्हा परीक्षेचं स्वरुप सविस्तर लेखी पद्धतीनं नियोजीत आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.