Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जयंत पाटील यांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला; महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंत पाटलाकडून कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. २ मार्च : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोनमेंट येथील पदाधिकारी मीनाताई पवार यांच्या रास्ता पेठ येथील शिवकृष्णा साबुदाणा वडा सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार भेटही दिली आणि मोठ्या चवीने साबुदाणा वडाही चाखला. यावेळी त्यांनी मीनाताई यांच्या धाडसाचे कौतुकही केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा काल पुण्यातील कॅन्टोनमेंट परिसरात पोहोचली. या निमित्ताने आयोजित केलेल्या आढावा बैठकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मंत्री जयंत पाटील यांना मीनाताई पवार यांची ओळख करून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पक्षाच्या कामकाजाचा आढावा मांडत असताना मीनाताई पवार यांनी आपल्या आयुष्याचा खडतर प्रवासही मंत्री जयंत पाटील यांना सांगितला. मीनाताई यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे पण त्यांनी न डगमगता आपल्या संसाराचा गाडा सुरूच ठेवला आणि साबुदाणा वड्याचा व्यवसाय करत आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिले. या बैठकीत मीनाताई यांनी मंत्री जयंत पाटील यांना आपल्या साबुदाणा वडा सेंटरला भेट देण्याचे निमंत्रण दिले, जयंत पाटील यांनी कितीही उशीर झाला तरी साबुदाणा वडा सेंटरला भेट देणार असे आश्वाशीत केले.

दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर दिलेल्या शब्दानुसार जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता मीनाताई पवार यांच्या साबुदाणा वडा सेंटरला भेटही दिली आणि साबुदाणा वडाही चाखला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही – जयंत पाटील

शौचालयाची टाकी साफ करताना तिघांचा नव्हे तर चौघांचा मृत्यू…!

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

Comments are closed.