Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 22 जुलै :-  राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गेल्या एक ते दोन दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी, आता पुन्हा  मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील पालघर, नाशिक, पुणे, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत यलो अलर्ट आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, मराठीचा बोलबाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बल्लारपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

 

Comments are closed.