Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“अनुजाने रोवला वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा.”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशिम दि,२५ सप्टेंबर : वाशिमच्या कु.अनुजा अनंत मुसळे याची केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत संपूर्ण भारतातून ५११ वी रँक प्राप्त करण्यात यश आले आहे.  कु. अनुजाचे शिक्षण दहावी वाशिम, बारावी फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे येथे झाले असून पुढील केंद्रीय लोकसेवा आयोगपरीक्षेचा अभ्यास दिल्ली येथे झाला.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच लाभलेल्या अतुलनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. श्रीमती छाया अनंत मुसळे सहायक अधीक्षक जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम आणि समाज कल्याण अधिकारी स्व. अनंतराव मुसळे यांची ती सुकन्या आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनुजाने कोविड काळात ऑनलाइन अभ्यास केला. कोविड काळात तिने अभ्यास सुरू ठेवल्यामुळे ह्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. वडील वारल्यानंतर ही खचून न जाता कु.अनुजा नेटाने अभ्यास करून यश मिळवले आहे.

परिक्षेकरिता अनुजा यांनी राज्य शास्त्र आणि आंतर राष्ट्रीय संबंध ह्या ऐच्छीक विषयची निवड केली होती. तिला प्रशासकिय सेवेतून भारतिय पोलिस सेवा किंवा भारतिय राजस्व सेवा अपेक्षित आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संपूर्ण जिल्हयातून मित्र परिवार,नातेवाईक तथा शुभचिंतक यांचेकडून कौतुकाचा वर्षाव अनुजा यांचेवर करण्यात येत आहे. आपल्या यशाचे श्रेय अनुजा यांनी आपले आई वडिल, भाऊ आणि शिक्षक यांना दिले आहे.

 

Comments are closed.