Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

PM Kisan योजनेचा नववा हप्ता आज; 9.75 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 19,500 कोटी रुपये

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होईल.

लोकस्पर्श न्यूज टीम

नवी दिल्ली 09 Aug 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान योजनेचा नववा हप्ता जारी करणार आहेत. आज (9 ऑगस्ट) दुपारी 12.30 वाजता एका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील 9.75 कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 19,500 कोटी रुपये वर्ग करणार आहेत.

काय आहे पीएम किसान योजना? 
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2019 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत एकूण रक्कमेचा विचार करता 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना 8 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.

Comments are closed.