Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा

५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कल्याण 8 जुलै :-  शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचे स्वागत करण्यात. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठींबा जाहीर केला. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील तब्बल ५५ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली.
दरम्यान यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.