Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा IED स्फोट, एक अधिकारी शहीद तर 10 जवान जखमी

बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या हि घटना घडवली.

छत्तीसगडमधील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रायपूर डेस्क 29 नोव्हेंबर :– छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत. त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं आहे.

ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा 206 बटालियनचे सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांच्यासह 1 अधिकारी आणि 8 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांनी अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर अन्य 9 जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Assistant Commandant Nitin Bhalerao

या घटनेबाबत जिल्ह्यातील पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितलं की, सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला गावाजवळ विस्फोट ठेवण्यात आले होते. यामुळे केंद्रीय रिझर्व पोलीस दलातील सीआरपीएफचे कोबरा बटालियनची अनेक जवान जखी झाले आहे. सीआरपीएफच्या २०६ कोबरा बटालियनच्या जवानांना पेट्रोलिंग करता या क्षेत्रात रवाना करण्यात आलं होतं. या पेट्रोलिंग दरम्यान नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

Comments are closed.