Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘अहंकार, सत्तेचा माज करू नका, सत्ता डोक्यात गेली तर जनता आपल्याला जागा दाखवून देते हे लक्षात ठेवा’-नितीन गडकरी

‘राज्य सरकार म्हाताऱ्या बैलासारखं, टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही’ गडकरींनी व्यक्त केली नाराजी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क  29 नोव्हें:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. सध्या पदविधर मतदारसंघासाठी निवडणुकांचा प्रचार सुरू असून त्यासाठीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. आपलं सरकार असतं तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे सरकार म्हणजे म्हाताऱ्या बैलासारखं आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही असंही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडकरी म्हणाले, नागपूरमधल्या ब्राडगेज मेट्रोसाठी राज्य सरकारची परवानगी मिळायला 1 वर्ष लागलं. एक वर्षानंतर मंजुरी मिळाली. त्यामुळे त्यासाठी धन्यवाद. अशा प्रसंगी कळतं की आपलं सरकार असतं तर एक महिन्यात ब्राडगेज मेट्रोला मंजुरी मिळाली असती. त्यासाठी मी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना फोन करून फॉलोअप घेतला.

गडकरी पुढे म्हणाले, आता ट्रॅक्टरही CNGवर चालविण्याचा सरकार विचार करत आहे. असं झालं तर शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचतील. विदर्भात शेतकऱ्यांकडे किमान 1 लाख ट्रॅक्टर असतील त्यामुळे खूप फायदा होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालं होतं. त्यासाठी कंत्राटही निघालं होतं. मात्र सरकार बदललं आणि तो प्रकल्प रखडला. असे अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.